Skip to content
जनता टाइम्स.in

जनता टाइम्स.in

जनतेचा निर्भीड आवाज

• Breaking
• आंतरराष्ट्रीय
• आरोग्य
• उद्योग विश्व
• कला
• क्रीडा
• गुन्हेगारी
• पिंपरी चिंचवड
• पुणे
• मनोरंजन
• महाराष्ट्र
• राजकीय
• शिक्षण
• सामाजिक
• Toggle search form
• ‘गांधर्व मंच’ आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेची घोषणा; ५० लाखांहून अधिकची बक्षिसे

पिंपरी चिंचवड – संपादक – शाम सोनवणेभारतीय संस्कृती, वारकरी संप्रदाय आणि संत साहित्याचा वारसा जोपासण्यासाठी ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ’ आणि ‘अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय महामंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “गांधर्व मंच” या आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य उपक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित बैठकीत नवीन नियमावली आणि वेळापत्रक जाहीर करण्यात आले.​प्रमुख उपस्थिती व...
Read More “‘गांधर्व मंच’ आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेची घोषणा; ५० लाखांहून अधिकची बक्षिसे” »

• शेकडो भंतेजी, हजारो उपासक; महाबोधी विहाराच्या हक्कासाठी दिल्लीत धडकणार भीमसागर!"
शेकडो भंतेजी, हजारो उपासक; महाबोधी विहाराच्या हक्कासाठी दिल्लीत धडकणार भीमसागर!”

पिंपरी-चिंचवड:  शाम सोनवणे बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे सर्व अधिकार बौद्धांना मिळावेत आणि १९४९ चा ‘बीटीएमसी’ (BTMC) ॲक्ट रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी १२ फेब्रुवारी २०२६ रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे भव्य आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. भंते विनयाचार्य यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पुण्यातील शेकडो भिक्खू संघ, भिक्खुणी संघ आणि हजारो उपासक दिल्लीकडे रवाना...
Read More “शेकडो भंतेजी, हजारो उपासक; महाबोधी विहाराच्या हक्कासाठी दिल्लीत धडकणार भीमसागर!”” »

• 'माझी वसुंधरा ५.०' मध्ये पिंपरी-चिंचवडचा डंका; १० लाखांहून अधिक लोकसंख्या गटात राज्यात प्रथम! भूमी विषयांतर्गतही सर्वोत्कृष्ट कामगिरी; १० कोटींचे बक्षीस जाहीर
‘माझी वसुंधरा ५.०’ मध्ये पिंपरी-चिंचवडचा डंका; १० लाखांहून अधिक लोकसंख्या गटात राज्यात प्रथम! PCMC
• समित्यांची निवड पूर्ण; सभापतीपदासाठी अभिषेक बारणे, राणी पठारे आणि सुजाता बोराटे यांचे अर्ज दाखल

शाम सोनवणे ( संपादक ) : पिंपरी, दि. २५ फेब्रुवारी २०२६:पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या विषय समित्यांच्या निवडीचा आणि सभापतीपदाच्या उमेदवारीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. २० फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत विषय समित्यांच्या सदस्यांची निवड झाल्यानंतर, आज (२५ फेब्रुवारी) विविध समित्यांच्या सभापतीपदासाठी भाजपने आपल्या अधिकृत उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत.सभापतीपदासाठी भाजपचे उमेदवार निश्चितआमदार शंकर जगताप...
Read More “समित्यांची निवड पूर्ण; सभापतीपदासाठी अभिषेक बारणे, राणी पठारे आणि सुजाता बोराटे यांचे अर्ज दाखल” »

• स्वच्छ सर्वेक्षण २०२६ ची व्यापक तयारी सुरू

पिंपरी प्रतिनिधी – शाम सोनवणे दि. १९ जानेवारी २०२६ :पिंपरी चिंचवड महानगरपालिकाकडून केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२६ साठी शहरभर व्यापक व नियोजनबद्ध तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली, तर उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल व सहाय्यक आयुक्त अमित पंडित यांच्या अधिपत्याखाली आरोग्य विभागामार्फत स्वच्छतेचे विविध अभिनव...
Read More “स्वच्छ सर्वेक्षण २०२६ ची व्यापक तयारी सुरू” »

• पवनाथडी जत्रेचे उद्या लकी ड्रॉ पद्धतीने स्टॉल वाटप; सांगवीतील पी.डब्ल्यू.डी. मैदानावर २५ फेब्रुवारीपासून रंगणार सोहळा

​पिंपरी चिंचवड – शाम सोनवणे ( संपादक ) :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या बहुप्रतिक्षित ‘पवनाथडी जत्रे’ची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या जत्रेतील स्टॉलचे वाटप उद्या, रविवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता लकी ड्रॉ (सोधत) पद्धतीने करण्यात येणार आहे. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील मा. मधुकरराव पवळे सभागृहात ही...
Read More “पवनाथडी जत्रेचे उद्या लकी ड्रॉ पद्धतीने स्टॉल वाटप; सांगवीतील पी.डब्ल्यू.डी. मैदानावर २५ फेब्रुवारीपासून रंगणार सोहळा” »

• सत्य शोधणारा आणि सत्यासाठी जगणारा म्हणजे पत्रकार – मंजुल भारद्वाज सामाजिक
• पश्चिम आशियाई संकट: पिंपरी चिंचवड महापालिकेकडून ‘मिशन काटकसर’; परदेश दौरे रद्द, कारपूलिंग आणि ई-वाहनांवर भर! PCMC

हिंजवडीत जमिनीच्या वादातून दोन शेतकऱ्यांचे बळी? बड्या विकासकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Posted on March 7, 2026March 7, 2026 By Janata Times

पिंपरी, दि. ६ मार्च (संपादक) : शाम सोनवणे –

पुण्यातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात एक खळबळजनक जमीन गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले आहे. जमिनीच्या हव्यासापोटी एका शेतकरी कुटुंबावर दबाव टाकून त्यांना संशयास्पद मृत्यूला कारणीभूत ठरल्याच्या गंभीर आरोपावरून हुलावळे कुटुंबाने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली आहे. या तक्रारीमध्ये काही बड्या जमीन व्यावसायिकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

नेमके प्रकरण काय ?

हिंजवडी येथील विशाल दत्तात्रय हुलावळे, विवेक अर्जुन हुलावळे आणि अर्जुन म्हातु हुलावळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मौजे हिंजवडी येथील सर्व्हे क्र. ६० आणि ६३/३ ही त्यांच्या मालकीची शेती जमीन आहे. या जमिनीच्या व्यवहारासाठी आरोपी अविनाश गणपत पाटील आणि श्रीपाद विमलचंद मेहता यांना मुखत्यारपत्र (Power of Attorney) द्यायचे ठरले होते. मात्र, आरोपींनी शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत विकसन करारनाम्याच्या नावाखाली परस्पर खरेदीखत करून फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादींनी केला आहे.

दोन वृद्धांचा संशयास्पद मृत्यू

हुलावळे कुटुंबाने अर्जात नमूद केले आहे की, जमिनीची न्यायालयीन प्रकरणे मागे घेण्यासाठी आरोपींकडून सतत धमकावले जात होते. या सातत्यपूर्ण दबावामुळे आणि प्रत्यक्ष दिलेल्या धमक्यांमुळे फिर्यादीचे वडील दत्तात्रय म्हातु हुलावळे यांचा १० सप्टेंबर २०२४ रोजी हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच त्यांचे चुलते काळुराम म्हातु हुलावळे यांचाही ९ फेब्रुवारी २०२५ रोजी संशयास्पद मृत्यू झाला. या दोन्ही मृत्यूंना आरोपींचा दबावच कारणीभूत असल्याचा थेट आरोप कुटुंबाने केला असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

पोलिसांशी ‘सेटिंग’ ची धमकी

तक्रारीत म्हटले आहे की, मे २०२५ मध्ये काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी हुलावळे यांच्या घरी जाऊन महिलांना धमकावले. “आमचे पोलिसांशी सेटिंग झाले आहे, आम्ही जमिनीचा ताबा लवकरच घेणार, मध्ये आलात तर खोट्या गुन्ह्यात अडकवू,” अशी धमकी या व्यक्तींनी दिली. आरोपी हे आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या अतिशय प्रभावशाली असल्याने स्थानिक पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नसल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे.

आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी

या प्रकरणात मुख्यत्वे अविनाश गणपत पाटील, श्रीपाद विमलचंद मेहता, मयूर वसंतलाल शेठिया आणि विजय विष्णू प्रसाद मर्दा यांची नावे घेण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, आरोपी विजय मर्दा याच्यावर अहिल्यानगर (अहमदनगर) येथे कित्येक कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीचे गुन्हे दाखल असून त्याला यापूर्वी अटकही झाली होती. या आरोपींनी मुळशी तालुक्यात सुमारे २००० एकर इतके क्षेत्र गोळा केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

शेतकऱ्यांची केविलवाणी साद

“आम्ही सामान्य शेतकरी असून आमच्याकडे या जमिनींव्यतिरिक्त दुसरे उत्पन्नाचे साधन नाही. आमची कोणाही वरिष्ठ पोलीस अधिकारी किंवा मंत्र्यांशी ओळख नाही,” असे हुलावळे यांनी अर्जात म्हटले आहे. आरोपींनी साम, दाम, दंड, भेद वापरून आम्हाला देशोधडीला लावले असून भविष्यात कुटुंबाच्या जिवाचे काही बरेवाईट झाल्यास त्याला आरोपीच जबाबदार राहतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा, अशी कळकळीची विनंती हुलावळे कुटुंबाने केली आहे.

Post Views: 121

Post navigation

Previous Post: रक्षक चौकातील उड्डाणपुलावरून शिवसेना-भाजपमध्ये जुंपली; खासदार बारणे आणि नगरसेविका चोंधे यांच्यात शाब्दिक युद्ध
Next Post: ॲक्शन मोडमध्ये महापौर! महिनाभरातच पिंपरी-चिंचवडच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी आखले धोरण
• पिंपरी-चिंचवड महापालिका मान्सूनसाठी सज्ज : 24×7 पूर नियंत्रण कक्षासह ‘कृती आराखडा 2026’ कार्यान्वित* PCMC
• पिंपरी-चिंचवडची कायदा व सुव्यवस्था कोलमडली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा: काँग्रेसची आक्रमक मागणी

दापोडीत विषारी दारूमुळे ३० नागरिकांचा मृत्यू झाल्याचा संशय; पोलीस आकडा लपवत असल्याचा नरेंद्र बनसोडे यांचा गंभीर आरोप; शहरात तीव्र नागरी आंदोलनाचा इशारा संपादक – शाम सोनवणे :- पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीतील दापोडी आणि फुगेवाडी परिसरात विषारी दारूच्या सेवनाने काही नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरातील अनधिकृत दारूगुत्त्यांवरून मृत्यूचा बाजार राजरोसपणे...
Read More “पिंपरी-चिंचवडची कायदा व सुव्यवस्था कोलमडली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा: काँग्रेसची आक्रमक मागणी” »

• शेकडो भंतेजी, हजारो उपासक; महाबोधी विहाराच्या हक्कासाठी दिल्लीत धडकणार भीमसागर!"
शेकडो भंतेजी, हजारो उपासक; महाबोधी विहाराच्या हक्कासाठी दिल्लीत धडकणार भीमसागर!”

पिंपरी-चिंचवड:  शाम सोनवणे बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे सर्व अधिकार बौद्धांना मिळावेत आणि १९४९ चा ‘बीटीएमसी’ (BTMC) ॲक्ट रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी १२ फेब्रुवारी २०२६ रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे भव्य आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. भंते विनयाचार्य यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पुण्यातील शेकडो भिक्खू संघ, भिक्खुणी संघ आणि हजारो उपासक दिल्लीकडे रवाना...
Read More “शेकडो भंतेजी, हजारो उपासक; महाबोधी विहाराच्या हक्कासाठी दिल्लीत धडकणार भीमसागर!”” »

• भोसरीतून सुरू झाली 'रोजगार क्रांती'; १५० हून अधिक कंपन्यांच्या सहकार्याने हजारो तरुणांना मिळणार मोफत नोकरी
भोसरीतून सुरू झाली ‘रोजगार क्रांती’; १५० हून अधिक कंपन्यांच्या सहकार्याने हजारो तरुणांना मिळणार मोफत नोकरी उद्योग विश्व
• पवनाथडी जत्रेचे उद्या लकी ड्रॉ पद्धतीने स्टॉल वाटप; सांगवीतील पी.डब्ल्यू.डी. मैदानावर २५ फेब्रुवारीपासून रंगणार सोहळा

​पिंपरी चिंचवड – शाम सोनवणे ( संपादक ) :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या बहुप्रतिक्षित ‘पवनाथडी जत्रे’ची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या जत्रेतील स्टॉलचे वाटप उद्या, रविवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता लकी ड्रॉ (सोधत) पद्धतीने करण्यात येणार आहे. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील मा. मधुकरराव पवळे सभागृहात ही...
Read More “पवनाथडी जत्रेचे उद्या लकी ड्रॉ पद्धतीने स्टॉल वाटप; सांगवीतील पी.डब्ल्यू.डी. मैदानावर २५ फेब्रुवारीपासून रंगणार सोहळा” »

• ‘गांधर्व मंच’ आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेची घोषणा; ५० लाखांहून अधिकची बक्षिसे

पिंपरी चिंचवड – संपादक – शाम सोनवणेभारतीय संस्कृती, वारकरी संप्रदाय आणि संत साहित्याचा वारसा जोपासण्यासाठी ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ’ आणि ‘अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय महामंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “गांधर्व मंच” या आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य उपक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित बैठकीत नवीन नियमावली आणि वेळापत्रक जाहीर करण्यात आले.​प्रमुख उपस्थिती व...
Read More “‘गांधर्व मंच’ आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेची घोषणा; ५० लाखांहून अधिकची बक्षिसे” »

• स्वच्छ सर्वेक्षण २०२६ ची व्यापक तयारी सुरू

पिंपरी प्रतिनिधी – शाम सोनवणे दि. १९ जानेवारी २०२६ :पिंपरी चिंचवड महानगरपालिकाकडून केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२६ साठी शहरभर व्यापक व नियोजनबद्ध तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली, तर उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल व सहाय्यक आयुक्त अमित पंडित यांच्या अधिपत्याखाली आरोग्य विभागामार्फत स्वच्छतेचे विविध अभिनव...
Read More “स्वच्छ सर्वेक्षण २०२६ ची व्यापक तयारी सुरू” »

• ॲक्शन मोडमध्ये महापौर! महिनाभरातच पिंपरी-चिंचवडच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी आखले धोरण

कचरा व्यवस्थापनासाठी विदेशी तंत्रज्ञान; अण्णासाहेब मगर स्टेडियमचा होणार कायापालट पिंपरी, दि. 6 मार्च 2026 (संपादक ) – शाम सोनवणे “महापौर पद स्वीकारल्यानंतर केवळ खुर्चीवर न बसता प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करण्याला मी प्राधान्य दिले आहे. गेल्या ३० दिवसांत शहराच्या विविध भागांचा दौरा करून नागरिकांच्या प्रश्नांची जी यादी तयार केली आहे, त्यावर आता प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू...
Read More “ॲक्शन मोडमध्ये महापौर! महिनाभरातच पिंपरी-चिंचवडच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी आखले धोरण” »

Copyright © 2026 जनता टाइम्स.in.

Powered by PressBook News WordPress theme