पिंपरी चिंचवड मनपाच्या शिक्षण मंडळातील भ्रष्टाचार थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा इशारा
पिंपरी, दि. १२ जून (प्रतिनिधी): शाम सोनवणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळामध्ये सुरू असलेला भ्रष्टाचार आणि ढिसाळ कारभार तात्काळ थांबवावा, तसेच पवना व इंद्रायणी नदीचे प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष चेतन पवार यांनी केली आहे. महापालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात शिवसेना पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात…
