संविधान भवन, आरोग्य सुविधा आणि रस्ते दुरुस्तीच्या कामांवर शिक्कामोर्तब; सभापती अभिषेक बारणे यांची माहिती
पिंपरी | प्रतिनिधी:- शाम सोनवणे
पिंपरी-चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास, आरोग्य सुविधांचे बळकटीकरण आणि पायाभूत सुविधांच्या सुधारणेसाठी महापालिका स्थायी समितीने कंबर कसली आहे. बुधवारी (दि. १० जून) झालेल्या स्थायी समिती सभेत शहरात ‘संविधान भवन’ उभारण्यासह आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि जलनिस्सारण व्यवस्थेशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण विषयांना सभापती अभिषेक बारणे यांनी मंजुरी दिली.
या बैठकीला स्थायी समिती सदस्यांसह अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, नगरसचिव मुकेश कोळप व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.शहरात साकारणार भव्य ‘संविधान भवन’या सभेतील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे ‘क’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत शहरात संविधान भवन व विपश्यना केंद्र :-
(टप्पा १) उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. लोकशाही मूल्यांचे जतन आणि सामाजिक प्रबोधनासाठी हे केंद्र मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास सभापतींनी व्यक्त केला.आरोग्य सुविधांवर विशेष भरशहरातील रुग्णालयांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
YCM रुग्णालय:- येथील पाणीपुरवठा व विद्युत व्यवस्थेच्या देखभालीसाठी मनुष्यबळाची नियुक्ती.
नवीन रुग्णालये:- भोसरी, यमुनानगर आणि थेरगाव रुग्णालयांची स्वच्छता, व्हेंटिलेटर्स आणि एक्स-रे मशीनच्या दुरुस्ती करारांना मंजुरी.
पदभरती:- यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (YCM) आवश्यक पदे सहा महिन्यांच्या मानधन तत्त्वावर भरण्यास मान्यता.पायाभूत सुविधा आणि रस्ते देखभालपावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जलनिस्सारण आणि रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे:
नाशिक फाटा ते मोशी (NH-60), केएसबी चौक ते चिंचवड स्टेशन आणि भक्तीशक्ती ते मुकाई चौक या प्रमुख रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीला मंजुरी.
चिखली, मोरे वस्ती, रूपीनगर, तळवडे, पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरातील ड्रेनेज लाईनचे जाळे विस्तारणे व दुरुस्त करणे.* ड्रेनेजसाठी खोदलेले चर ‘हॉटमिक्स’ पद्धतीने डांबरीकरण करून रस्ते पूर्ववत करणे.
स्वच्छता अभियान:-‘महाराष्ट्र स्वच्छता अभियान’ अंतर्गत जनजागृती आणि दापोडी येथे ‘शून्य कचरा प्रकल्प’ राबवण्याचा निर्णय.
दफनभूमी देखभाल:-
मुस्लिम, ख्रिश्चन व लिंगायत समाजाच्या ५ दफनभूमींच्या देखभालीसाठी काळजीवाहकांची नियुक्ती.
पर्यावरण :- तळवडे येथील बायोडायव्हर्सिटी पार्कसाठी नवीन उच्चदाब वीजपुरवठा घेण्यास मंजुरी.
– “शहराच्या शाश्वत आणि नियोजनबद्ध विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आज मंजूर झालेले विषय केवळ पायाभूत सुविधांपुरते मर्यादित नसून आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरणाशी निगडित आहेत. विशेषतः संविधान भवनामुळे शहराच्या वैचारिक वैभवात भर पडेल. सर्व मंजूर कामांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर आमचा भर राहील.”— अभिषेक बारणे, सभापती, स्थायी समिती (PCMC)
