(संपादक) :- शाम सोनवणे
स्वरांजली कला-क्रीडा मंच आयोजित भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी आयु. विजय गंगाराम भालेराव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी ही समिती कार्य करते. विजय भालराव यांच्या निवडीमुळे या उपक्रमांना अधिक गती मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
या निवडीच्या वेळी स्वरांजली कला-क्रीडा मंचचे अध्यक्ष आयु. प्रकाशभाऊ डोळस यांच्यासह सिद्धार्थ पवार, राजेश थोरात, प्रभाकर माने, धम्मपाल गायकवाड, देवानंद अंभोरे आणि आनंद सांवत या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
बिनविरोध निवडीनंतर विजय भालेराव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, आगामी काळात विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
