शाम सोनवणे – पिंपरी प्रतिनिधी :
“अजितदादांच्या प्रत्येक संघर्षात सावलीसारख्या खंबीरपणे उभ्या राहिलेल्या सुनेत्रा वहिनी आजही तितक्याच निर्धाराने उभ्या आहेत. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्या दादांच्या विचारांची मशाल सक्षमपणे धगधगती ठेवतील,” असे प्रतिपादन माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर (लोंढे) यांनी केले. अजितदादांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या पोकळीत सुनेत्रा वहिनींनी घेतलेल्या खंबीर भूमिकेचे कौतुक करताना डॉ. घोडेकर बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, सुनेत्रा वहिनींनी केवळ अश्रू पुसले नाहीत, तर दादांच्या निष्ठेचा आणि जनतेवरील प्रेमाचा वारसा जपण्यासाठी स्वतःला झोकून दिले आहे. कार्यकर्त्यांच्या मनात ‘आपली माणसं परकी होतील का?’ अशी धाकधूक असतानाच वहिनींनी दिलेला आधार हा रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीच्या नात्याची साक्ष देणारा आहे.
सुनेत्रा वहिनी अजितदादांच्या विचारांचा वारसा खंबीरपणे पुढे नेतील – डॉ. वैशाली घोडेकर यांनी व्यक्त केला विश्वास
‘लाडक्या बहिणींचा’ वाढला आत्मविश्वाससुनेत्रा वहिनींच्या रूपाने राज्यातील लाडक्या बहिणींचा तुटलेला आत्मविश्वास पुन्हा जागा झाला आहे. “दादा” हे केवळ नाव नसून तो लाखो लोकांचा विश्वास होता, तोच विश्वास आज वहिनींच्या नेतृत्वातून पुन्हा श्वास घेत आहे.कार्यकर्त्यांसाठी आधारवडआज सुनेत्रा वहिनी केवळ एका कुटुंबापुरत्या मर्यादित न राहता, लाखो कार्यकर्त्यांसाठी ‘आधारवड’ झाल्या आहेत. वेदनांवर मात करून उभी राहणारी त्यांची ही निष्ठा आणि माणुसकीच खरी ‘दादांची परंपरा’ आहे, अशा भावना डॉ. वैशाली घोडेकर यांनी यावेळी व्यक्त केल्या. काळाच्या पुढे पाहणारी वहिनींची ही दूरदृष्टी पोरक्या झालेल्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत आशेचा नवा दीप पेटवत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
