
संपादक – शाम सोनवणे
पिंपरी, दि. २० फेब्रुवारी २०२६:
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कामकाजात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीसह पाच विषय समित्यांच्या सदस्य निवडीची प्रक्रिया आज पार पडली. महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत पक्षीय बलाबलानुसार या सदस्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली.
महापौर रवि लांडगे यांनी सर्व नवनियुक्त सदस्यांचे अभिनंदन केले आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक कार्य होईल, असा विश्वास व्यक्त केला.
समितीनिहाय निवड झालेल्या सदस्यांची संपूर्ण यादी:
१. स्थायी समिती (एकूण १६ सदस्य)
महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या मानल्या जाणाऱ्या या समितीवर सर्वाधिक ११ सदस्य भाजपचे आहेत.
भारतीय जनता पार्टी (११): अभिषेक बारणे, शालिनी गुजर, मनिषा चिंचवडे, संदीप कस्पटे, सारीका गायकवाड, योगिता नागरगोजे, कृष्णा सुरकुले, शीतल वर्नेकर, अर्चना करांडे, मधुरा शिंदे, बाबासाहेब त्रिभुवन.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (४): सविता आसवानी, संतोष कोकणे, संदीप वाघेरे, विकास साने.
शिवसेना (१): सुलभा उबाळे.
२. विधी समिती (एकूण ९ सदस्य)
भारतीय जनता पार्टी (६): ज्ञानेश्वर जगताप, विनायक गायकवाड, कुंदा भिसे, सुजाता बोराटे, श्रुती डोळस, कुशाग्र कदम.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (३): शेखर चिंचवडे, वर्षा जगताप, तुषार सहाणे.
३. शहर सुधारणा समिती (एकूण ९ सदस्य)
भारतीय जनता पार्टी (६): अर्चना सस्ते, विनोद नढे, कुणाल वाव्हळकर, संजय (नाना) काटे, सुहास कांबळे, उत्तमराव केंदळे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (३): डॉ. वैशाली घोडेकर-लोंढे, अनंत कोऱ्हाळे, वैशाली काळभोर.
४. शिक्षण समिती (एकूण ९ सदस्य)
भारतीय जनता पार्टी (६): पल्लवी वाल्हेकर, श्रुती वाकडकर, रविना आंगोळकर, कविता भोंगाळे, रीटा सानप, सारिका बोऱ्हाडे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (३): प्रियांका कुदळे, योगिता बारणे, यश साने.
५. महिला व बालकल्याण समिती (एकूण ९ सदस्य)
भारतीय जनता पार्टी (६): पल्लवी जगताप, नीता पाडाळे, रेश्मा भुजबळ, शिवानी नरळे, राणी पठारे, सुप्रिया चांदगुडे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (३): निकिता कदम, सारिका मासूळकर, मनिषा लांडे.
६. क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती (एकूण ९ सदस्य)
भारतीय जनता पार्टी (६): कैलास कुटे, शाम जगताप, तानाजी बारणे, धर्मपाल तंतरपाळे, उदय गायकवाड, योगेश लांडगे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (३): भाऊसाहेब भोईर, जितेंद्र ननावरे, प्रमोद कुटे.
राजकीय आणि प्रशासकीय उपस्थिती
या निवडीसाठी भाजपच्या वतीने पक्षनेते प्रशांत शितोळे, राष्ट्रवादीच्या वतीने गटनेते भाऊसाहेब भोईर आणि शिवसेनेच्या वतीने गटनेते विश्वजित बारणे यांनी नावांचे बंद लिफाफे महापौरांकडे सुपूर्द केले होते.
या सभेला उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त श्रावण हर्डीकर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे यांच्यासह सर्व नगरसदस्य व महापालिका वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. निवडीनंतर महापौरांच्या हस्ते सर्व सदस्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
