Skip to content
जनता टाइम्स.in

जनता टाइम्स.in

जनतेचा निर्भीड आवाज

• Breaking
• आंतरराष्ट्रीय
• आरोग्य
• उद्योग विश्व
• कला
• क्रीडा
• गुन्हेगारी
• पिंपरी चिंचवड
• पुणे
• मनोरंजन
• महाराष्ट्र
• राजकीय
• शिक्षण
• सामाजिक
• Toggle search form
• पश्चिम आशियाई संकट: पिंपरी चिंचवड महापालिकेकडून ‘मिशन काटकसर’; परदेश दौरे रद्द, कारपूलिंग आणि ई-वाहनांवर भर! PCMC
• शेकडो भंतेजी, हजारो उपासक; महाबोधी विहाराच्या हक्कासाठी दिल्लीत धडकणार भीमसागर!"
शेकडो भंतेजी, हजारो उपासक; महाबोधी विहाराच्या हक्कासाठी दिल्लीत धडकणार भीमसागर!”

पिंपरी-चिंचवड:  शाम सोनवणे बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे सर्व अधिकार बौद्धांना मिळावेत आणि १९४९ चा ‘बीटीएमसी’ (BTMC) ॲक्ट रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी १२ फेब्रुवारी २०२६ रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे भव्य आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. भंते विनयाचार्य यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पुण्यातील शेकडो भिक्खू संघ, भिक्खुणी संघ आणि हजारो उपासक दिल्लीकडे रवाना...
Read More “शेकडो भंतेजी, हजारो उपासक; महाबोधी विहाराच्या हक्कासाठी दिल्लीत धडकणार भीमसागर!”” »

• पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्थायीसह विषय समित्यांची निवड; महापौर रवि लांडगे यांच्याकडून नवनियुक्त सदस्यांचे अभिनंदन

​संपादक – शाम सोनवणे पिंपरी, दि. २० फेब्रुवारी २०२६:पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कामकाजात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीसह पाच विषय समित्यांच्या सदस्य निवडीची प्रक्रिया आज पार पडली. महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत पक्षीय बलाबलानुसार या सदस्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली.​महापौर रवि लांडगे यांनी सर्व नवनियुक्त सदस्यांचे अभिनंदन केले आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी...
Read More “पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्थायीसह विषय समित्यांची निवड; महापौर रवि लांडगे यांच्याकडून नवनियुक्त सदस्यांचे अभिनंदन” »

• फुगेवाडी विषारी दारू प्रकरण: महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतली वायसीएममधील रुग्णांची भेट; मोफत उपचारांची घोषणा

संपादक – शाम सोनवणे :– पिंपरी (दि. २९ मे २०२६): फुगेवाडी येथे घडलेल्या विषारी दारू प्रकरणात बाधित झालेल्या व यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रुग्णालयाला भेट दिली. या दुर्घटनेतील सर्व रुग्णांवर महापालिका रुग्णालयात मोफत उपचार केले जातील, अशी घोषणा आयुक्तांनी यावेळी...
Read More “फुगेवाडी विषारी दारू प्रकरण: महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतली वायसीएममधील रुग्णांची भेट; मोफत उपचारांची घोषणा” »

• ‘गांधर्व मंच’ आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेची घोषणा; ५० लाखांहून अधिकची बक्षिसे

पिंपरी चिंचवड – संपादक – शाम सोनवणेभारतीय संस्कृती, वारकरी संप्रदाय आणि संत साहित्याचा वारसा जोपासण्यासाठी ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ’ आणि ‘अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय महामंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “गांधर्व मंच” या आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य उपक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित बैठकीत नवीन नियमावली आणि वेळापत्रक जाहीर करण्यात आले.​प्रमुख उपस्थिती व...
Read More “‘गांधर्व मंच’ आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेची घोषणा; ५० लाखांहून अधिकची बक्षिसे” »

• स्वच्छ सर्वेक्षण २०२६ ची व्यापक तयारी सुरू

पिंपरी प्रतिनिधी – शाम सोनवणे दि. १९ जानेवारी २०२६ :पिंपरी चिंचवड महानगरपालिकाकडून केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२६ साठी शहरभर व्यापक व नियोजनबद्ध तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली, तर उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल व सहाय्यक आयुक्त अमित पंडित यांच्या अधिपत्याखाली आरोग्य विभागामार्फत स्वच्छतेचे विविध अभिनव...
Read More “स्वच्छ सर्वेक्षण २०२६ ची व्यापक तयारी सुरू” »

• महापालिकेच्या रणांगणात 'भाऊ'चा अनुभव पणाला
सभागृह गाजणार ! विरोधी पक्षनेतेपदाची माळ भाऊसाहेब भोईर यांच्या गळ्यात

सभागृह गाजणार ! विरोधी पक्षनेतेपदाची माळ भाऊसाहेब भोईर यांच्या गळ्यात सत्ताधारी भाजपला घेरणार की समन्वयाचे राजकारण करणार ? शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण पिंपरी-चिंचवड | विशेष प्रतिनिधी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या ‘भाऊसाहेब भोईर’ या नावाभोवती मोठी चर्चा रंगली आहे. प्रदीर्घ अनुभव, प्रशासकीय कामाचा व्यासंग आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दांडगा संपर्क असलेल्या भाऊसाहेब भोईर यांची राष्ट्रवादी...
Read More “सभागृह गाजणार ! विरोधी पक्षनेतेपदाची माळ भाऊसाहेब भोईर यांच्या गळ्यात” »

• ॲक्शन मोडमध्ये महापौर! महिनाभरातच पिंपरी-चिंचवडच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी आखले धोरण

कचरा व्यवस्थापनासाठी विदेशी तंत्रज्ञान; अण्णासाहेब मगर स्टेडियमचा होणार कायापालट पिंपरी, दि. 6 मार्च 2026 (संपादक ) – शाम सोनवणे “महापौर पद स्वीकारल्यानंतर केवळ खुर्चीवर न बसता प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करण्याला मी प्राधान्य दिले आहे. गेल्या ३० दिवसांत शहराच्या विविध भागांचा दौरा करून नागरिकांच्या प्रश्नांची जी यादी तयार केली आहे, त्यावर आता प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू...
Read More “ॲक्शन मोडमध्ये महापौर! महिनाभरातच पिंपरी-चिंचवडच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी आखले धोरण” »

पिंपरी-चिंचवडची कायदा व सुव्यवस्था कोलमडली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा: काँग्रेसची आक्रमक मागणी

Posted on May 30, 2026May 30, 2026 By Janata Times No Comments on पिंपरी-चिंचवडची कायदा व सुव्यवस्था कोलमडली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा: काँग्रेसची आक्रमक मागणी

दापोडीत विषारी दारूमुळे ३० नागरिकांचा मृत्यू झाल्याचा संशय; पोलीस आकडा लपवत असल्याचा नरेंद्र बनसोडे यांचा गंभीर आरोप; शहरात तीव्र नागरी आंदोलनाचा इशारा

संपादक – शाम सोनवणे :-

पिंपरी-चिंचवड:

पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीतील दापोडी आणि फुगेवाडी परिसरात विषारी दारूच्या सेवनाने काही नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरातील अनधिकृत दारूगुत्त्यांवरून मृत्यूचा बाजार राजरोसपणे सुरू असल्याचे उघड झाले असून, संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराची कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र आहे. या गंभीर घटनेचा निषेध करत, राज्याला तात्काळ पूर्णवेळ गृहमंत्री देण्यात यावा आणि सद्यस्थितीला जबाबदार असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा तातडीने राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे.

पोलिसांनी कंत्राटदार-नफेखोरांशी हातमिळवणी केल्याचा संशय

या भीषण घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच त्यांनी दापोडी पोलीस स्टेशनला भेट देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना नरेंद्र बनसोडे यांनी अत्यंत खळबळजनक दावा केला. ते म्हणाले, “विषारी दारूमुळे मृत्युमुखी पडलेले मजूर आणि तरुण यांची संख्या जवळपास ३० च्या आसपास असल्याचे समजते आहे. |मात्र, पोलीस प्रशासनाकडून हा आकडा जाणीवपूर्वक लपवला जात असल्याचा तीव्र संशय आम्हाला आहे.”

मृतांमध्ये प्रामुख्याने संजयनगर, कुष्ठरोग्यांची वसाहत, स्थानिक झोपडपट्टी आणि आझाद चौक परिसरातील गरीब नागरिकांचा समावेश आहे. हे सर्व मृत नागरिक अवघ्या ४०० मीटरच्या परिघात राहणारे होते. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, स्थानिक पोलीस स्टेशनपासून अवघ्या काही मीटर अंतरावर हा अवैध दारूचा गुत्ता गेल्या १५ वर्षांपासून खुलेआम सुरू होता. हा प्रकार म्हणजे पोलिसांच्या आशीर्वादाने आणि प्रशासनाशी हातमिळवणी करून दारूचे साम्राज्य थाटणाऱ्या नफेखोर व्यावसायिकांचा छुपा करार आहे. त्यामुळे या प्रकरणाची विशेष यंत्रणेद्वारे सखोल चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केले पाहिजे.

पिंपरी-चिंचवड बनले अवैध धंद्यांचा अड्डा

शहरातील एकूणच बिघडलेल्या सुरक्षिततेवर बोट ठेवत नरेंद्र बनसोडे यांनी राज्य सरकारवर कडक शब्दांत प्रहार केला. ते म्हणाले कि, पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही महिन्यांत गुन्हेगारीने टोक गाठले आहे. ठिकठिकाणी गाड्यांची तोडफोड करणे, अल्पवयीन मुली मोठ्या प्रमाणात बेपत्ता होणे, खून, मारामार्‍या, आणि किरकोळ कारणांवरून थेट कोयत्याचा वापर करणे अशा घटना रोज घडत आहेत. शहरात ‘कोयता गँग’ची मोठी दहशत निर्माण झाली असून दुकानांवर हल्ले केले जात आहेत. नुकतीच खंडणीसाठी एका नामांकित व्यावसायिकाच्या दुकानावर जाहीर गोळीबाराची घटना घडली. या सर्व समाजविघातक प्रवृत्ती राजरोसपणे सक्रिय झाल्या असून, त्यांना रोखण्यात स्थानिक पोलीस बळ पूर्णपणे असमर्थ ठरले आहे. एकंदरीतच पिंपरी-चिंचवड शहर आता काळ्या धंद्यांचा, गुन्हेगारीचा, पोलिसी भ्रष्टाचाराचा आणि अवैध व्यवसायांचा मुख्य अड्डा बनले आहे.

लोकप्रियता वाचवण्यासाठी नागरिकांच्या जीवाशी खेळ: काँग्रेसचा आरोप

मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्लाबोल करताना काँग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी सांगितले की, गेल्या अनेक महिन्यांपासून आमची मागणी आहे की महाराष्ट्राला एक स्वतंत्र आणि पूर्णवेळ गृहमंत्री मिळायला हवा. परंतु, गृहमंत्री पदावर अतोनात प्रेम असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या पदाला चिकटून बसले आहेत. त्यांना राज्यातील आणि शहरातील या गंभीर बाबींचा आढावा घेण्यासाठी अजिबात वेळ नाही. त्यांना केवळ मोठमोठ्या प्रकल्पांचा गाजावाजा करून सवंग लोकप्रियता मिळवण्यात रस आहे. मात्र गुन्हेगारांवर वचक बसवण्यात आणि सर्वसामान्यांना सुरक्षा देण्यात त्यांची भूमिका पूर्णपणे अपयशी ठरली आहे. महिला, अल्पवयीन मुले आणि नवविवाहितांवर होणारे अत्याचार तसेच हुंडाबळीच्या वाढत्या घटना या गोष्टीची साक्ष आहेत. पॉक्सको (POCSO) न्यायालयाला मंजुरी मिळूनही ती महाराष्ट्रात का उभी राहिली नाहीत? राज्यातील वाढत्या गुन्ह्यांचे ऑडिट का केले जात नाही? जनतेला खरे आकडे सांगायला सरकार का घाबरत आहे? स्वतःची लोकप्रियता घसरू नये म्हणून नागरिकांना वेठीस धरून त्यांच्या जीवाशी खेळ खेळण्याचे काम राज्य सरकारच्या आशीर्वादाने सुरू आहे.

काँग्रेस पक्षाच्या ४ प्रमुख मागण्या:

या भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने प्रशासनासमोर खालील मागण्या ठेवल्या आहेत:

• १) गृहमंत्रीपदाचा राजीनामा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि राज्याला त्वरित पूर्णवेळ गृहमंत्री नेमावा.
• २) दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन: दापोडीतील या विषारी दारूच्या गंभीर प्रकाराला जबाबदार असणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात यावे.
• ३) पीडित कुटुंबांचे पुनर्वसन: या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या गरीब नागरिकांच्या कुटुंबांचे तात्काळ पुनर्वसन करून त्यांना शासनातर्फे भरीव आर्थिक मदत देण्यात यावे.
• ४) अवैध धंदे मुळासकट नष्ट करा: पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व प्रकारचे अवैध धंदे, मटका, आणि दारूगोठे पोलिसांच्या माध्यमातून तात्काळ नष्ट करण्यात यावेत आणि त्याबाबत काय कारवाई केली, याचा सविस्तर खुलासा पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करावा.

तीव्र आंदोलनाचा इशारा: “या मागण्यांवर जर येत्या काही दिवसांत राज्य शासनाने आणि पोलीस प्रशासनाने सकारात्मक व कडक पावले उचलली नाहीत, तर काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी शेवटी दिला आहे

Post Views: 32

Post navigation

Previous Post: पिंपरी-चिंचवड मनपाच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदावरून प्रवीण जैन यांची उचलबांगडी; सत्यवान उबाळे यांच्याकडे धुरा
Next Post: फुगेवाडी विषारी दारू प्रकरण: महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतली वायसीएममधील रुग्णांची भेट; मोफत उपचारांची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

• फुगेवाडी विषारी दारू प्रकरण: महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतली वायसीएममधील रुग्णांची भेट; मोफत उपचारांची घोषणा

संपादक – शाम सोनवणे :– पिंपरी (दि. २९ मे २०२६): फुगेवाडी येथे घडलेल्या विषारी दारू प्रकरणात बाधित झालेल्या व यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रुग्णालयाला भेट दिली. या दुर्घटनेतील सर्व रुग्णांवर महापालिका रुग्णालयात मोफत उपचार केले जातील, अशी घोषणा आयुक्तांनी यावेळी...
Read More “फुगेवाडी विषारी दारू प्रकरण: महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतली वायसीएममधील रुग्णांची भेट; मोफत उपचारांची घोषणा” »

• हिंजवडीत जमिनीच्या वादातून दोन शेतकऱ्यांचे बळी? बड्या विकासकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

पिंपरी, दि. ६ मार्च (संपादक) : शाम सोनवणे – पुण्यातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात एक खळबळजनक जमीन गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले आहे. जमिनीच्या हव्यासापोटी एका शेतकरी कुटुंबावर दबाव टाकून त्यांना संशयास्पद मृत्यूला कारणीभूत ठरल्याच्या गंभीर आरोपावरून हुलावळे कुटुंबाने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली आहे. या तक्रारीमध्ये काही बड्या जमीन व्यावसायिकांविरुद्ध खुनाचा गुन्हा...
Read More “हिंजवडीत जमिनीच्या वादातून दोन शेतकऱ्यांचे बळी? बड्या विकासकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी” »

• पश्चिम आशियाई संकट: पिंपरी चिंचवड महापालिकेकडून ‘मिशन काटकसर’; परदेश दौरे रद्द, कारपूलिंग आणि ई-वाहनांवर भर! PCMC
• पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्थायीसह विषय समित्यांची निवड; महापौर रवि लांडगे यांच्याकडून नवनियुक्त सदस्यांचे अभिनंदन

​संपादक – शाम सोनवणे पिंपरी, दि. २० फेब्रुवारी २०२६:पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कामकाजात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीसह पाच विषय समित्यांच्या सदस्य निवडीची प्रक्रिया आज पार पडली. महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत पक्षीय बलाबलानुसार या सदस्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली.​महापौर रवि लांडगे यांनी सर्व नवनियुक्त सदस्यांचे अभिनंदन केले आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी...
Read More “पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्थायीसह विषय समित्यांची निवड; महापौर रवि लांडगे यांच्याकडून नवनियुक्त सदस्यांचे अभिनंदन” »

• 'साहित्य संवर्धन आघाडी'
मसाप निवडणूक: दहा वर्षांची सत्ता मोडीत काढण्यासाठी ‘साहित्य संवर्धन आघाडी’ मैदानात मृतांच्या नावावर मतदान आणि घराणेशाहीचे आरोप; कासारवाडीतील पत्रकार परिषदेत खळबळजनक दावे साहित्य
• पिंपरीत २२ फेब्रुवारीला ‘संविधान गुण गौरव’ पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्र
• विकसकांनो सावधान! सोसायट्यांना पाणी न दिल्यास होणार थेट फौजदारी कारवाई; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा कडक इशारा

पिंपरी | विशेष प्रतिनिधी | शाम सोनवणे :- पिंपरी-चिंचवड शहरात घराचा ताबा देताना पाणीपुरवठ्याची लेखी हमी देणाऱ्या विकसकांनी (Developers) आता आपली जबाबदारी झटकल्यास त्यांना पालिकेच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. “ज्या विकसकांनी हमीपत्र देऊनही सोसायट्यांना पाणी पुरवले नाही किंवा पाण्याचा आर्थिक भार सभासदांवर टाकला, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा स्पष्ट इशारा महापालिका आयुक्त...
Read More “विकसकांनो सावधान! सोसायट्यांना पाणी न दिल्यास होणार थेट फौजदारी कारवाई; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा कडक इशारा” »

• पिंपरी-चिंचवडकरांसाठी खुशखबर! आता सुट्टीच्या दिवशीही भरता येणार मालमत्ता कर​प्रशासनाचा मोठा निर्णय

संपादक – शाम सोनवणे पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कंबर कसली आहे. मार्चअखेर जवळ येत असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कर वसुलीला गती देण्यासाठी आता सर्व शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कर संकलन कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.​ वेळेत वाढ आणि १८...
Read More “पिंपरी-चिंचवडकरांसाठी खुशखबर! आता सुट्टीच्या दिवशीही भरता येणार मालमत्ता कर​प्रशासनाचा मोठा निर्णय” »

Copyright © 2026 जनता टाइम्स.in.

Powered by PressBook News WordPress theme