पवनाथडी जत्रेचे उद्या लकी ड्रॉ पद्धतीने स्टॉल वाटप; सांगवीतील पी.डब्ल्यू.डी. मैदानावर २५ फेब्रुवारीपासून रंगणार सोहळा
पिंपरी चिंचवड – शाम सोनवणे ( संपादक ) :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या बहुप्रतिक्षित ‘पवनाथडी जत्रे’ची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या जत्रेतील स्टॉलचे वाटप उद्या, रविवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता लकी ड्रॉ (सोधत) पद्धतीने करण्यात येणार आहे. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील मा. मधुकरराव पवळे सभागृहात ही…
