Skip to content
जनता टाइम्स.in

जनता टाइम्स.in

जनतेचा निर्भीड आवाज

• Breaking
• आंतरराष्ट्रीय
• आरोग्य
• उद्योग विश्व
• कला
• क्रीडा
• गुन्हेगारी
• पिंपरी चिंचवड
• पुणे
• मनोरंजन
• महाराष्ट्र
• राजकीय
• शिक्षण
• सामाजिक
• Toggle search form
• तळेगाव दाभाडे: टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये यशस्वी उपचार; कर्करुग्णाची प्रेरणादायी झुंज

संपादक – शाम सोनवणे (पुणे ) : वय वर्ष ७४, कर्करोगाचा चौथा टप्पा आणि पूर्णपणे गेलेला आवाज… अशा कठीण परिस्थितीतही जिद्द आणि आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या जोरावर पिंपरी-चिंचवडच्या एका रुग्णाने मृत्यूला हुलकावणी दिली आहे. तळेगाव दाभाडे येथील टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर (OLCC) मध्ये झालेल्या प्रगत उपचारामुळे जनार्दन उमाळे यांचा घशाचा कर्करोग तर बरा झालाच, पण...
Read More “तळेगाव दाभाडे: टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये यशस्वी उपचार; कर्करुग्णाची प्रेरणादायी झुंज” »

• रक्षक चौकातील उड्डाणपुलावरून शिवसेना-भाजपमध्ये जुंपली; खासदार बारणे आणि नगरसेविका चोंधे यांच्यात शाब्दिक युद्ध PCMC
• समित्यांची निवड पूर्ण; सभापतीपदासाठी अभिषेक बारणे, राणी पठारे आणि सुजाता बोराटे यांचे अर्ज दाखल

शाम सोनवणे ( संपादक ) : पिंपरी, दि. २५ फेब्रुवारी २०२६:पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या विषय समित्यांच्या निवडीचा आणि सभापतीपदाच्या उमेदवारीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. २० फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत विषय समित्यांच्या सदस्यांची निवड झाल्यानंतर, आज (२५ फेब्रुवारी) विविध समित्यांच्या सभापतीपदासाठी भाजपने आपल्या अधिकृत उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत.सभापतीपदासाठी भाजपचे उमेदवार निश्चितआमदार शंकर जगताप...
Read More “समित्यांची निवड पूर्ण; सभापतीपदासाठी अभिषेक बारणे, राणी पठारे आणि सुजाता बोराटे यांचे अर्ज दाखल” »

• पिंपरी-चिंचवडची कायदा व सुव्यवस्था कोलमडली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा: काँग्रेसची आक्रमक मागणी

दापोडीत विषारी दारूमुळे ३० नागरिकांचा मृत्यू झाल्याचा संशय; पोलीस आकडा लपवत असल्याचा नरेंद्र बनसोडे यांचा गंभीर आरोप; शहरात तीव्र नागरी आंदोलनाचा इशारा संपादक – शाम सोनवणे :- पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीतील दापोडी आणि फुगेवाडी परिसरात विषारी दारूच्या सेवनाने काही नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरातील अनधिकृत दारूगुत्त्यांवरून मृत्यूचा बाजार राजरोसपणे...
Read More “पिंपरी-चिंचवडची कायदा व सुव्यवस्था कोलमडली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा: काँग्रेसची आक्रमक मागणी” »

• 'साहित्य संवर्धन आघाडी'
मसाप निवडणूक: दहा वर्षांची सत्ता मोडीत काढण्यासाठी ‘साहित्य संवर्धन आघाडी’ मैदानात मृतांच्या नावावर मतदान आणि घराणेशाहीचे आरोप; कासारवाडीतील पत्रकार परिषदेत खळबळजनक दावे साहित्य
• पिंपरी-चिंचवडकरांसाठी खुशखबर! आता सुट्टीच्या दिवशीही भरता येणार मालमत्ता कर​प्रशासनाचा मोठा निर्णय

संपादक – शाम सोनवणे पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कंबर कसली आहे. मार्चअखेर जवळ येत असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कर वसुलीला गती देण्यासाठी आता सर्व शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कर संकलन कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.​ वेळेत वाढ आणि १८...
Read More “पिंपरी-चिंचवडकरांसाठी खुशखबर! आता सुट्टीच्या दिवशीही भरता येणार मालमत्ता कर​प्रशासनाचा मोठा निर्णय” »

• भोसरीतून सुरू झाली 'रोजगार क्रांती'; १५० हून अधिक कंपन्यांच्या सहकार्याने हजारो तरुणांना मिळणार मोफत नोकरी
भोसरीतून सुरू झाली ‘रोजगार क्रांती’; १५० हून अधिक कंपन्यांच्या सहकार्याने हजारो तरुणांना मिळणार मोफत नोकरी उद्योग विश्व
• महापालिकेच्या रणांगणात 'भाऊ'चा अनुभव पणाला
सभागृह गाजणार ! विरोधी पक्षनेतेपदाची माळ भाऊसाहेब भोईर यांच्या गळ्यात

सभागृह गाजणार ! विरोधी पक्षनेतेपदाची माळ भाऊसाहेब भोईर यांच्या गळ्यात सत्ताधारी भाजपला घेरणार की समन्वयाचे राजकारण करणार ? शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण पिंपरी-चिंचवड | विशेष प्रतिनिधी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या ‘भाऊसाहेब भोईर’ या नावाभोवती मोठी चर्चा रंगली आहे. प्रदीर्घ अनुभव, प्रशासकीय कामाचा व्यासंग आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दांडगा संपर्क असलेल्या भाऊसाहेब भोईर यांची राष्ट्रवादी...
Read More “सभागृह गाजणार ! विरोधी पक्षनेतेपदाची माळ भाऊसाहेब भोईर यांच्या गळ्यात” »

पिंपरी-चिंचवड महापालिका मान्सूनसाठी सज्ज : 24×7 पूर नियंत्रण कक्षासह ‘कृती आराखडा 2026’ कार्यान्वित*

Posted on May 27, 2026May 27, 2026 By Janata Times No Comments on पिंपरी-चिंचवड महापालिका मान्सूनसाठी सज्ज : 24×7 पूर नियंत्रण कक्षासह ‘कृती आराखडा 2026’ कार्यान्वित*

पिंपरी, दि. 27 मे 2026 (जनता टाइम्स) – शाम सोनवणे – संपादक –

आगामी मान्सूनमध्ये संभाव्य अतिवृष्टी, पाणी साचणे आणि पूरजन्य परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका पूर्णपणे सज्ज झाली आहे. नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व क्षेत्रीय कार्यालय स्तरावर 24×7 पूर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मान्सून कृती आराखडा 2026’ तयार करून तो तातडीने कार्यान्वित करण्यात आला आहे.

L0 ते L4 स्तरावर पूरस्थितीचे वर्गीकरण :-

महापालिकेने पूरस्थितीचे L0 ते L4 अशा विविध स्तरांमध्ये वर्गीकरण केले आहे. नदीपात्रातील पाण्याची पातळी, पवना-मुळशी धरणातील विसर्ग आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार टप्प्याटप्प्याने उपाययोजना केल्या जाणार आहेत. धरण विसर्ग वाढल्यास नदीकाठच्या वस्त्या व सखल भागात मेगाफोन व सार्वजनिक ध्वनीक्षेपकाद्वारे नागरिकांना सतर्क केले जाईल. गरज भासल्यास नागरिकांचे सुरक्षितस्थळी तातडीने स्थलांतर करण्यात येईल.

मदत शिबिरे व बचाव यंत्रणा सज्ज :-

संभाव्य पूरग्रस्त नागरिकांसाठी शाळा इमारतींमध्ये मदत शिबिरे उभारली जाणार असून तिथे निवारा, अन्न, पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छता व आरोग्य सुविधा पुरवल्या जातील. अग्निशामक विभागाने रबर बोटी, लाईफ जॅकेट, दोरखंड व प्रशिक्षित पथके सज्ज ठेवली आहेत. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात ‘जलद प्रतिसाद पथक’ (QRT) तैनात राहणार असून नावाडी, जीवरक्षक, सर्पमित्र व स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे.पूर्वतयारीची कामे युद्धपातळीवरपावसाळ्यापूर्वी नालेसफाई, गटारसफाई व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कामे जोरात सुरू आहेत. पाणी उपसा पंप, पोर्टेबल पंप, जेसीबी, क्रेन व डंपर सज्ज ठेवण्यात आले आहेत. नदीकाठची अतिक्रमणे, धोकादायक व मोडकळीस आलेल्या इमारती, होर्डिंग्ज व मोबाईल टॉवर्सची तपासणी करून कारवाई सुरू आहे. विद्युत खांब, डीपी बॉक्स व ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती करून पूरस्थितीत पर्यायी प्रकाश व्यवस्था केली जाणार आहे.

आरोग्य व पाणीपुरवठ्यावर विशेष भर:-

दूषित पाणी पिण्याच्या वाहिन्यांमध्ये मिसळू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. आरोग्य विभागामार्फत धुरीकरण, औषध फवारणी व स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. सर्व रुग्णालये, रुग्णवाहिका व सर्पदंशावरील औषधे सज्ज ठेवली आहेत. धोकादायक झाडांची छाटणी करून वीजवाहिन्यांवरील फांद्या हटवल्या जात आहेत.

वाहतूक व संप्रेषण व्यवस्था:-

पूरामुळे बाधित होणाऱ्या रस्त्यांचे सर्वेक्षण करून पर्यायी मार्ग निश्चित केले जाणार आहेत. बॅरिकेड्स, इशारा फलक व पाणीपातळी निर्देशक बसवले जातील. सर्व नियंत्रण कक्ष व विभागीय कार्यालयांमधील वायरलेस व इंटरनेट यंत्रणा 24×7 सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. जनसंपर्क विभागामार्फत आपत्कालीन सूचना वेळोवेळी प्रसारित केल्या जातील.

‘नागरिकांनी सहकार्य करावे’ – आयुक्तांचे आवाहन -“पावसाळ्यात नागरिकांच्या जीवित व मालमत्तेची हानी टाळणे, तात्काळ मदत व बचावकार्य राबविणे हे आमचे प्राधान्य आहे. सर्व विभागांनी सतर्क राहून जबाबदारीने काम करावे. नागरिकांनीही प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे,” असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले. अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे म्हणाले, “पूरनियंत्रण, नागरिकांचे स्थलांतर, मदत शिबिरे व पाणी उपसा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. क्षेत्रीय कार्यालयांनी समन्वयाने काम करून तातडीने मदत द्यावी.” पूर ओसरल्यानंतर तातडीने स्वच्छता मोहीम राबवली जाणार असून गरज पडल्यास एनडीआरएफ व इतर यंत्रणांची मदत घेतली जाणार आहे.

Post Views: 36
PCMC

Post navigation

Previous Post: पश्चिम आशियाई संकट: पिंपरी चिंचवड महापालिकेकडून ‘मिशन काटकसर’; परदेश दौरे रद्द, कारपूलिंग आणि ई-वाहनांवर भर!
Next Post: पिंपरी-चिंचवड मनपाच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदावरून प्रवीण जैन यांची उचलबांगडी; सत्यवान उबाळे यांच्याकडे धुरा

Related Posts

• पिंपरी-चिंचवड मनपाच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदावरून प्रवीण जैन यांची उचलबांगडी; सत्यवान उबाळे यांच्याकडे धुरा PCMC
• रक्षक चौकातील उड्डाणपुलावरून शिवसेना-भाजपमध्ये जुंपली; खासदार बारणे आणि नगरसेविका चोंधे यांच्यात शाब्दिक युद्ध PCMC
• महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल सुनेत्रा वहिनींचे हार्दिक अभिनंदन! breaking
• 'माझी वसुंधरा ५.०' मध्ये पिंपरी-चिंचवडचा डंका; १० लाखांहून अधिक लोकसंख्या गटात राज्यात प्रथम! भूमी विषयांतर्गतही सर्वोत्कृष्ट कामगिरी; १० कोटींचे बक्षीस जाहीर
‘माझी वसुंधरा ५.०’ मध्ये पिंपरी-चिंचवडचा डंका; १० लाखांहून अधिक लोकसंख्या गटात राज्यात प्रथम! PCMC
• अजितदादा पवार यांच्या अस्थि कलश दर्शनाचे उद्या पिंपरीत आयोजन; दुपारी देहू येथे विसर्जन PCMC
• पश्चिम आशियाई संकट: पिंपरी चिंचवड महापालिकेकडून ‘मिशन काटकसर’; परदेश दौरे रद्द, कारपूलिंग आणि ई-वाहनांवर भर! PCMC

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

• हिंजवडीत जमिनीच्या वादातून दोन शेतकऱ्यांचे बळी? बड्या विकासकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

पिंपरी, दि. ६ मार्च (संपादक) : शाम सोनवणे – पुण्यातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात एक खळबळजनक जमीन गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले आहे. जमिनीच्या हव्यासापोटी एका शेतकरी कुटुंबावर दबाव टाकून त्यांना संशयास्पद मृत्यूला कारणीभूत ठरल्याच्या गंभीर आरोपावरून हुलावळे कुटुंबाने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली आहे. या तक्रारीमध्ये काही बड्या जमीन व्यावसायिकांविरुद्ध खुनाचा गुन्हा...
Read More “हिंजवडीत जमिनीच्या वादातून दोन शेतकऱ्यांचे बळी? बड्या विकासकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी” »

• युवकांनो सावधान! नोकरीच्या नावाखाली होणारी फसवणूक टाळा; महापौर रवि लांडगे यांचा 'मोफत नोकरी'चा मास्टरप्लॅन
युवकांनो सावधान! नोकरीच्या नावाखाली होणारी फसवणूक टाळा; महापौर रवि लांडगे यांचा ‘मोफत नोकरी’चा मास्टरप्लॅन

भोसरी (प्रतिनिधी): राज्यातील आणि परराज्यातील हजारो तरुण-तरुणी रोजगाराच्या आशेने पिंपरी-चिंचवड आणि चाकण या औद्योगिक नगरीत येत असतात. मात्र, अनेकदा योग्य मार्गदर्शनाअभावी या तरुणांची एजंटकडून आर्थिक फसवणूक केली जाते. तरुणांची ही वणवण थांबवण्यासाठी आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि बाबासाहेब लांडगे यांच्या संकल्पनेतून ‘महापौर युवा संकल्प रोजगार, कौशल्य विकास व करिअर मार्गदर्शन केंद्र’...
Read More “युवकांनो सावधान! नोकरीच्या नावाखाली होणारी फसवणूक टाळा; महापौर रवि लांडगे यांचा ‘मोफत नोकरी’चा मास्टरप्लॅन” »

• भोसरीतून सुरू झाली 'रोजगार क्रांती'; १५० हून अधिक कंपन्यांच्या सहकार्याने हजारो तरुणांना मिळणार मोफत नोकरी
भोसरीतून सुरू झाली ‘रोजगार क्रांती’; १५० हून अधिक कंपन्यांच्या सहकार्याने हजारो तरुणांना मिळणार मोफत नोकरी उद्योग विश्व
• महापालिकेच्या रणांगणात 'भाऊ'चा अनुभव पणाला
सभागृह गाजणार ! विरोधी पक्षनेतेपदाची माळ भाऊसाहेब भोईर यांच्या गळ्यात

सभागृह गाजणार ! विरोधी पक्षनेतेपदाची माळ भाऊसाहेब भोईर यांच्या गळ्यात सत्ताधारी भाजपला घेरणार की समन्वयाचे राजकारण करणार ? शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण पिंपरी-चिंचवड | विशेष प्रतिनिधी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या ‘भाऊसाहेब भोईर’ या नावाभोवती मोठी चर्चा रंगली आहे. प्रदीर्घ अनुभव, प्रशासकीय कामाचा व्यासंग आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दांडगा संपर्क असलेल्या भाऊसाहेब भोईर यांची राष्ट्रवादी...
Read More “सभागृह गाजणार ! विरोधी पक्षनेतेपदाची माळ भाऊसाहेब भोईर यांच्या गळ्यात” »

• पवनाथडी जत्रेचे उद्या लकी ड्रॉ पद्धतीने स्टॉल वाटप; सांगवीतील पी.डब्ल्यू.डी. मैदानावर २५ फेब्रुवारीपासून रंगणार सोहळा

​पिंपरी चिंचवड – शाम सोनवणे ( संपादक ) :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या बहुप्रतिक्षित ‘पवनाथडी जत्रे’ची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या जत्रेतील स्टॉलचे वाटप उद्या, रविवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता लकी ड्रॉ (सोधत) पद्धतीने करण्यात येणार आहे. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील मा. मधुकरराव पवळे सभागृहात ही...
Read More “पवनाथडी जत्रेचे उद्या लकी ड्रॉ पद्धतीने स्टॉल वाटप; सांगवीतील पी.डब्ल्यू.डी. मैदानावर २५ फेब्रुवारीपासून रंगणार सोहळा” »

• पिंपरी-चिंचवडमध्ये ‘संविधान कार्यशाळा’ व ‘गुणगौरव सोहळा’ उत्साहात संपन्न

फुगे फोडून अनिष्ट प्रथांच्या विळख्यातून मुक्ततेचा अनोखा संदेश पिंपरी चिंचवड :- (संपादक) :- शाम सोनवणे“संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक किंवा भाषणबाजीचा विषय नसून, ती एक जीवनपद्धती आहे. मानवी मूल्यांना पायदळी तुडवणाऱ्या अनिष्ट प्रथांचा अंत संविधानाने केला आहे,” असा सूर पिंपरी येथील संविधान कार्यशाळेत उमटला.संविधान गुणगौरव समिती (रायगड) आणि संविधान सजगता मंच (पिंपरी-चिंचवड) यांच्या संयुक्त विद्यमाने...
Read More “पिंपरी-चिंचवडमध्ये ‘संविधान कार्यशाळा’ व ‘गुणगौरव सोहळा’ उत्साहात संपन्न” »

• दै. सम्राट’चे झुंजार पत्रकार अशोक उर्फ नाना गायकवाड यांचे निधन; पिंपरी-चिंचवड पत्रकार संघातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

पिंपरी चिंचवड : (संपादक) : शाम सोनवणे आपल्या लेखणीतून अन्यायाला वाचा फोडणारे आणि पिंपरी-चिंचवडमधील पत्रकारितेतील एक अनुभवी व्यक्तिमत्व, दैनिक ‘वृत्तरत्न सम्राट’चे झुंजार पत्रकार अशोक उर्फ नाना गायकवाड यांचे आज, १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता वाय.सी.एम. रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या जाण्याने पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. दापोडी येथील स्मशानभूमीत...
Read More “दै. सम्राट’चे झुंजार पत्रकार अशोक उर्फ नाना गायकवाड यांचे निधन; पिंपरी-चिंचवड पत्रकार संघातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली” »

• पश्चिम आशियाई संकट: पिंपरी चिंचवड महापालिकेकडून ‘मिशन काटकसर’; परदेश दौरे रद्द, कारपूलिंग आणि ई-वाहनांवर भर! PCMC

Copyright © 2026 जनता टाइम्स.in.

Powered by PressBook News WordPress theme