Skip to content
जनता टाइम्स.in

जनता टाइम्स.in

जनतेचा निर्भीड आवाज

• Breaking
• आंतरराष्ट्रीय
• आरोग्य
• उद्योग विश्व
• कला
• क्रीडा
• गुन्हेगारी
• पिंपरी चिंचवड
• पुणे
• मनोरंजन
• महाराष्ट्र
• राजकीय
• शिक्षण
• सामाजिक
• Toggle search form
• 'माझी वसुंधरा ५.०' मध्ये पिंपरी-चिंचवडचा डंका; १० लाखांहून अधिक लोकसंख्या गटात राज्यात प्रथम! भूमी विषयांतर्गतही सर्वोत्कृष्ट कामगिरी; १० कोटींचे बक्षीस जाहीर
‘माझी वसुंधरा ५.०’ मध्ये पिंपरी-चिंचवडचा डंका; १० लाखांहून अधिक लोकसंख्या गटात राज्यात प्रथम! PCMC
• पिंपरी-चिंचवडमध्ये शरीरसौष्ठवाचा महाकुंभ! ‘महापौर चषक’ राष्ट्रीय स्पर्धेचा थरार उद्यापासून; दिग्गज नेत्यांची मांदियाळी क्रीडा
• अजितदादा पवार यांच्या अस्थि कलश दर्शनाचे उद्या पिंपरीत आयोजन; दुपारी देहू येथे विसर्जन PCMC
• पिंपरी-चिंचवडकरांसाठी खुशखबर! आता सुट्टीच्या दिवशीही भरता येणार मालमत्ता कर​प्रशासनाचा मोठा निर्णय

संपादक – शाम सोनवणे पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कंबर कसली आहे. मार्चअखेर जवळ येत असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कर वसुलीला गती देण्यासाठी आता सर्व शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कर संकलन कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.​ वेळेत वाढ आणि १८...
Read More “पिंपरी-चिंचवडकरांसाठी खुशखबर! आता सुट्टीच्या दिवशीही भरता येणार मालमत्ता कर​प्रशासनाचा मोठा निर्णय” »

• रक्षक चौकातील उड्डाणपुलावरून शिवसेना-भाजपमध्ये जुंपली; खासदार बारणे आणि नगरसेविका चोंधे यांच्यात शाब्दिक युद्ध PCMC
• भोसरीतून सुरू झाली 'रोजगार क्रांती'; १५० हून अधिक कंपन्यांच्या सहकार्याने हजारो तरुणांना मिळणार मोफत नोकरी
भोसरीतून सुरू झाली ‘रोजगार क्रांती’; १५० हून अधिक कंपन्यांच्या सहकार्याने हजारो तरुणांना मिळणार मोफत नोकरी उद्योग विश्व
• 'साहित्य संवर्धन आघाडी'
मसाप निवडणूक: दहा वर्षांची सत्ता मोडीत काढण्यासाठी ‘साहित्य संवर्धन आघाडी’ मैदानात मृतांच्या नावावर मतदान आणि घराणेशाहीचे आरोप; कासारवाडीतील पत्रकार परिषदेत खळबळजनक दावे साहित्य
• सत्य शोधणारा आणि सत्यासाठी जगणारा म्हणजे पत्रकार – मंजुल भारद्वाज सामाजिक

​पिंपरी-चिंचवड महापालिकेचा विकासकामांवर जोर; स्थायी समितीकडून कोट्यवधींच्या प्रस्तावांना मंजुरी

Posted on March 26, 2026March 26, 2026 By Janata Times

संपादक – शाम सोनवणे
पिंपरी-चिंचवड शहरातील पायाभूत सुविधा, आरोग्य आणि वाहतूक व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या विविध विकासकामांना आज स्थायी समितीच्या बैठकीत हिरवा कंदील दाखवण्यात आला. यामध्ये पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोग, चिखलीतील सांडपाणी प्रकल्प आणि शहरातील सायकल ट्रॅकच्या कामांचा प्रामुख्याने समावेश आहे.
​पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात पार पडलेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे होते. या बैठकीला आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर यांच्यासह स्थायी समितीचे सर्व सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते.
​बैठकीतील महत्त्वाचे निर्णय:
​पीएमपीएमएल सेवकांना दिलासा: पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोग फरकाचा दुसरा हप्ता देण्यासाठी, सन २०२५-२६ च्या संचलन तुटीपोटी अग्रीम रक्कम देण्यास मान्यता देण्यात आली.
​सांडपाणी पुनर्वापर (चिखली प्रकल्प): चिखली येथील ५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या ‘अल्ट्राफिल्ट्रेशन प्लांट’मधून प्रक्रिया केलेले सांडपाणी पुरवण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
​सायकलिंग उपक्रमाला गती: शहरात शाश्वत दळणवळण आणि सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी सल्लागार नेमणे आणि बीआयसीआय (BICI) संस्थेकडून प्राप्त अनुदानातून सायकल ट्रॅक व पायाभूत सुविधांची कामे करण्यास मंजुरी देण्यात आली.
​झोपडपट्टी भागात नवीन शौचालये: प्रभाग क्र. ७ (शांतीनगर) आणि प्रभाग क्र. ८ (बालाजीनगर) मधील जुनी व मोडकळीस आलेली सामुदायिक शौचालये पाडून त्या ठिकाणी अद्ययावत नवीन शौचालये उभारली जाणार आहेत.
​आरोग्य आणि स्वच्छता: महापालिका रुग्णालयांत कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नियुक्त करणे, तसेच डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधासाठी क्षेत्रीय कार्यालयांना फॉगिंग मशीनसह वाहने भाड्याने घेण्याच्या खर्चास मंजुरी दिली.
​”शहराचा समतोल विकास साधतानाच नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा आणि शाश्वत वाहतूक पर्याय उपलब्ध करून देण्यावर आमचा भर आहे. आज मंजूर करण्यात आलेल्या विषयांमुळे प्रलंबित कामांना गती मिळेल.”
— अभिषेक बारणे, सभापती, स्थायी समिती.
​याशिवाय, पालिकेचे जलतरण तलाव भाडेतत्वावर चालवण्यास देणे, विविध विभागांसाठी लॅपटॉप खरेदी आणि राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या कामकाजासाठी कर्मचारी संख्या वाढवणे अशा विविध प्रशासकीय विषयांनाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

Post Views: 124

Post navigation

Previous Post: ॲक्शन मोडमध्ये महापौर! महिनाभरातच पिंपरी-चिंचवडच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी आखले धोरण
Next Post: पिंपरी-चिंचवडमध्ये शरीरसौष्ठवाचा महाकुंभ! ‘महापौर चषक’ राष्ट्रीय स्पर्धेचा थरार उद्यापासून; दिग्गज नेत्यांची मांदियाळी
• 'माझी वसुंधरा ५.०' मध्ये पिंपरी-चिंचवडचा डंका; १० लाखांहून अधिक लोकसंख्या गटात राज्यात प्रथम! भूमी विषयांतर्गतही सर्वोत्कृष्ट कामगिरी; १० कोटींचे बक्षीस जाहीर
‘माझी वसुंधरा ५.०’ मध्ये पिंपरी-चिंचवडचा डंका; १० लाखांहून अधिक लोकसंख्या गटात राज्यात प्रथम! PCMC
• 'साहित्य संवर्धन आघाडी'
मसाप निवडणूक: दहा वर्षांची सत्ता मोडीत काढण्यासाठी ‘साहित्य संवर्धन आघाडी’ मैदानात मृतांच्या नावावर मतदान आणि घराणेशाहीचे आरोप; कासारवाडीतील पत्रकार परिषदेत खळबळजनक दावे साहित्य
• ‘गांधर्व मंच’ आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेची घोषणा; ५० लाखांहून अधिकची बक्षिसे

पिंपरी चिंचवड – संपादक – शाम सोनवणेभारतीय संस्कृती, वारकरी संप्रदाय आणि संत साहित्याचा वारसा जोपासण्यासाठी ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ’ आणि ‘अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय महामंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “गांधर्व मंच” या आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य उपक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित बैठकीत नवीन नियमावली आणि वेळापत्रक जाहीर करण्यात आले.​प्रमुख उपस्थिती व...
Read More “‘गांधर्व मंच’ आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेची घोषणा; ५० लाखांहून अधिकची बक्षिसे” »

• पिंपरी-चिंचवड मनपाच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदावरून प्रवीण जैन यांची उचलबांगडी; सत्यवान उबाळे यांच्याकडे धुरा PCMC
• दै. सम्राट’चे झुंजार पत्रकार अशोक उर्फ नाना गायकवाड यांचे निधन; पिंपरी-चिंचवड पत्रकार संघातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

पिंपरी चिंचवड : (संपादक) : शाम सोनवणे आपल्या लेखणीतून अन्यायाला वाचा फोडणारे आणि पिंपरी-चिंचवडमधील पत्रकारितेतील एक अनुभवी व्यक्तिमत्व, दैनिक ‘वृत्तरत्न सम्राट’चे झुंजार पत्रकार अशोक उर्फ नाना गायकवाड यांचे आज, १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता वाय.सी.एम. रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या जाण्याने पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. दापोडी येथील स्मशानभूमीत...
Read More “दै. सम्राट’चे झुंजार पत्रकार अशोक उर्फ नाना गायकवाड यांचे निधन; पिंपरी-चिंचवड पत्रकार संघातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली” »

• रक्षक चौकातील उड्डाणपुलावरून शिवसेना-भाजपमध्ये जुंपली; खासदार बारणे आणि नगरसेविका चोंधे यांच्यात शाब्दिक युद्ध PCMC
• विकसकांनो सावधान! सोसायट्यांना पाणी न दिल्यास होणार थेट फौजदारी कारवाई; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा कडक इशारा

पिंपरी | विशेष प्रतिनिधी | शाम सोनवणे :- पिंपरी-चिंचवड शहरात घराचा ताबा देताना पाणीपुरवठ्याची लेखी हमी देणाऱ्या विकसकांनी (Developers) आता आपली जबाबदारी झटकल्यास त्यांना पालिकेच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. “ज्या विकसकांनी हमीपत्र देऊनही सोसायट्यांना पाणी पुरवले नाही किंवा पाण्याचा आर्थिक भार सभासदांवर टाकला, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा स्पष्ट इशारा महापालिका आयुक्त...
Read More “विकसकांनो सावधान! सोसायट्यांना पाणी न दिल्यास होणार थेट फौजदारी कारवाई; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा कडक इशारा” »

• शेकडो भंतेजी, हजारो उपासक; महाबोधी विहाराच्या हक्कासाठी दिल्लीत धडकणार भीमसागर!"
शेकडो भंतेजी, हजारो उपासक; महाबोधी विहाराच्या हक्कासाठी दिल्लीत धडकणार भीमसागर!”

पिंपरी-चिंचवड:  शाम सोनवणे बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे सर्व अधिकार बौद्धांना मिळावेत आणि १९४९ चा ‘बीटीएमसी’ (BTMC) ॲक्ट रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी १२ फेब्रुवारी २०२६ रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे भव्य आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. भंते विनयाचार्य यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पुण्यातील शेकडो भिक्खू संघ, भिक्खुणी संघ आणि हजारो उपासक दिल्लीकडे रवाना...
Read More “शेकडो भंतेजी, हजारो उपासक; महाबोधी विहाराच्या हक्कासाठी दिल्लीत धडकणार भीमसागर!”” »

Copyright © 2026 जनता टाइम्स.in.

Powered by PressBook News WordPress theme